नाशिक: विधी संघर्षित मुलांकडून 6 लाखाचा ऐवज जप्त
नाशिक (प्रतिनिधी): विधि संघर्षित बालक यांच्याकडून अंबड पोलिसांनी लाखो रूपायांची रोकड आणि सोन्याच्या वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अंबड पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
सिडकोच्या बडदे नगर येथील बाळासाहेब ठाकरे उदयान बाहेर येथे काही मुल हातात पिशवी घेवुन फिरत असतांना लाख-लाख रुपये वाटुन घेण्याच्या गप्पा मारत असून, त्यांचेजवळील पिशवीमध्ये काहीतरी मौल्यवान वस्तु आहे अशी खात्रीशीर बातमी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यांनतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचनु संशयीतरित्या फिरणाऱ्या विधी संघर्षित बालकांकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून २००० रुपयांच्या ३० चलनी नोटा आणि ५०० रुपयांच्या ९६६ भारतीय चलनी नोटा असा एकुण ५ लाख ४३ हजार रुपये, आणि एक ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची १० ग्रॅम वजनाची अंगठी असा एकुण ५ लाख ९३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी जप्त केला आहे. या विधी संघर्षित बालकांकडे एवढा मुद्देमाल कुठून आणि कसा आला याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करत आहे….