नाशिक: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; दोन वेळा गर्भपात
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून व अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपीने पीडित महिलेशी संवाद साधून तिच्याशी ओळख वाढविली.
त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर संशयित आरोपीने दि. 23 जानेवारी 2020 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत विहितगाव येथे पीडित महिलेचा पाठलाग केला.
संशयित आरोपीने त्याच्या घरी पीडित महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्याची भीती पीडित महिलेला घातली, तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिला दोन वेळा गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करण्याच्या गोळ्या तिला बळजबरीने खाण्यास देऊन दोन वेळा गर्भपात केला.
- नाशिक: रस्त्यावरील खड्ड्याने घेतला आणखी एका महिलेचा बळी!
- नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून पतीशी फारकत घेण्यास भाग पाडत महिलेवर अत्याचार
दरम्यान, दोन वर्षांपासून लग्नाचा तगादा लावूनही आरोपीने लग्न केले नाही, तसेच तिच्यावर अत्याचार करून तिला त्रास दिला. वारंवार होणार्या या छळाला कंटाळून पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.