नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून पतीशी फारकत घेण्यास भाग पाडत महिलेवर अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे खोटे आमिष दाखवून पतीशी फारकत घेण्यास भाग पाडून महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिलेशी आरोपी इसमाने ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला.
या महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून आरोपीने तिला तिच्या पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले.
त्यानंतर आरोपीने पीडित महिलेवर वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध दि. १४ फेब्रुवारी २०२० ते दि. १३ एप्रिल २०२१ या कालावधीत वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.
तसेच आरोपी इसमाने पीडित महिलेचे शारीरिक व मानसिक शोषण केले. एवढेच नव्हे, तर पीडित महिलेशी लग्न न करता तिला शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिली. आरोपी इसम हा लैंगिक शोषण करूनही लग्न करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक येसेकर करीत आहेत.