Follow Up: जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर

Follow Up: जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर मोठी आग लागली आहे.

सकाळच्या सुमारास लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. मात्र या आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 17 जण जखमी झाले आहे.

यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीची माहिती घेत योग्य ती मदत पुरणव्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये सकाळच्या सुमाराच मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की या त्याचा आवाज आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये ऐकायला मिळाला. आग इतकी मोठी होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार झाल्याचे दिसून आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग पसरल्याने ती विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

सध्या ही आग आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या आणि ॲम्बुलन्स या कंपनीत पाठवण्यात आल्या आहेत. या कंपनीत एकूण 15000 कर्मचारी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पॉलिफिल्मची ही कंपनी असून अनेक कामगार यामध्ये अडकले आहेत. जखमींना सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीतील इंधनाच्या टाकीला आग लागल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे सावधरित्या इतर कामगारांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत:
नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790