नाशिक: धक्का लागल्याच्या कारणावरून बाऊन्सरसह दोघांनी केली बेदम मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): ख्रिसमसच्या सार्वजनिक कार्यक्रमात डिसूझा कॉलनीत धक्का लागल्याच्या कारणातून बाऊन्सरसह दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर आणि डोळय़ावर लोखंडी वस्तू मारण्यात आल्या आहे.
या मारहाणीची तक्रार शिवम राजेंद्र पाटील (२२ रा.रामवाडी,पंचवटी) या युवकाने दिली असून गंगापूर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल जाधव, रितेश साळवे व एक बाऊन्सर अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
- नाशिक: नायलॉन मांजाने ६७ वर्षीय वृद्धाच्या पायाला गंभीर जखम…
- नाशिक: भांडण सोडवल्याच्या रागातून चौघांकडून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
कॉलेजरोडवरील डिसूजा कॉलनीतील एका हॉटेलमध्ये रविवारी (दि.२५) रात्री ख्रिसमस निमित्त सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पाटील गेले असता ही घटना घडली. गर्दीत पाटील यांचा संशयित बाऊन्सरला धक्का लागला. यावेळी बाऊन्सरसह दोघा परिचीतांनी पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी वस्तूचा वापर करण्यात आल्याने पाटील यांच्या डोक्यास आणि डोळय़ात गंभीर दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.