नाशिक: भांडण सोडवल्याच्या रागातून चौघांकडून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): हॉटेलमधील भांडण सोडविल्याचा राग आल्याने चार जणांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नरेंद्र राजेंद्र खैरनार (वय २३, रा. अमरधामरोड, साईबाबा मंदिरा-शेजारी, जुने नाशिक) हा व त्याचा मित्र राहुल जाधव हे दोघे जण अन्य एक मित्र सुरज सोनवणे याच्यासोबत अशोका मार्गावरील गणेशबाबा रोड येथे असलेल्या एका चहाच्या दुकानाजवळ बोलत उभे होते.
त्यावेळी फिर्यादी खैरनार फिर्यादी खैरनार व त्याचे आणखी मित्र रोहित म्हस्के व राहुल ब्राह्मणे यांच्यात तपोवन गार्डन हॉटेलमध्ये झालेले भांडण सोडवल्याचा राग मनात धरुन आरोपी तौसिफ पिंजारी, राहुल ब्राह्मणे, आदित्य गायकवाड व ललित शिंदे (सर्व रा. बजरंगवाडी, नाशिक) यांनी वाद उकरुन काढला.
वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी चारही आरोपींनी खैरनार यास शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण करत राहुल ब्राह्मणे याने नरेंद्र खैरनार याच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली.
- नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी
- Nashik Breaking : नाशिकमध्ये वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
तसेच ब्राह्मणे याने जवळच असलेल्या धारदार व तीक्ष्ण हत्याराने खैरनार यांच्या मानेवर वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार २५ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तौसिफ पिंजारी, आदित्य गायकवाड व ललित शिंदे यांना काल अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.