Accident News: नाशिक शहरात वेगवेगळ्या चार अपघातांत इतके जण ठार

नाशिक (प्रतिनिधी): शहर परिसरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन ठार तर एक जण जखमी झाले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताचा पहिला प्रकार फुलेनगरजवळ घडला. नामदेव गोविंद मौले (वय ५१, रा. स्नेहनगर, म्हसरूळ) हे १२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एम.एच.१५ बी.एफ.९३५७ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी फुलेनगर येथील बच्छाव हॉस्पिटलसमोर घसरल्याने ते जमिनीवर पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस नाईक गजेंद्र बरेलीकर यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

अपघाताचा दुसरा प्रकार गडकरी चौकाजवळ घडला. फिर्यादी जितेंद्र अनिल मोरे (रा. निवाणे, ता. कळवण) हे एम.एच.४१ एझेड १५७० या क्रमांकाची इर्टिका कार घेऊन जात असताना त्र्यंबक नाका येथे सिग्नल सुरु असल्यामुळे थांबले होते. त्यावेळी पाठिमागून आलेल्या एम.एच.२० व्हीएल ३८१८ या क्रमांकाच्या बसवरील चालक योगेश कैलास चव्हाण (रा. हर्सुल, ता.जि. औरंगाबाद) याने पाठिमागून कारला धडक दिली. यावेळी कारमध्ये असलेली दिया सौरव जाधव (रा. क्रांतीनगर, मखमलाबादरोड) हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तर इतर तीन वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बिरारी करीत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

अपघाताचा तिसरा प्रकार नाशिकरोड येथे घडला. काशिबाई मुरलीधर पवार (वय ७०, रा. गोदरेजवाडी, सिन्नरफाटा, नाशिकरोड) ही वृद्ध महिला दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सिन्नर फाट्याकरून एकलहर्‍याकडे रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी रस्ता क्रॉस करत असताना भरधाव आलेल्या एम.एच.१५ एच. ८२96 या क्रमांकाच्या आयशर गाडी चालकाने धडक दिली. त्यात वृद्धेच्या हातापायाला डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना काल त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक मनपाची मोठी कारवाई; नाशिकरोड, पंचवटी व सिडको परिसरातील ९५ ठिकाणी अतिक्रमण हटविले

अपघाताचा चौथा प्रकार अंबड येथे घडला. शोभावती दूधनाथ यती (वय ७०, रा. दत्तनगर, अंबड, नाशिक) या दि.२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जावई सत्यप्रकाश सुरत गिरी यांच्या मोटारसायकलवर बसत असताना तोल जाऊन पडल्याने कमरेला व मांडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना औषधोपचारासाठी त्यांचे पती दूधनाथ गिरी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचार सुरु असताना त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790