Nashik Crime Patrol; ४ कोटी रुपयांचा विमा लाटला’, खून करत अपघाताचा रचला बनाव! 

Nashik Crime Patrol; ४ कोटी रुपयांचा विमा लाटला’, खून करत अपघाताचा रचला बनाव! 

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल चार कोटींचा विमा  लाटल्याचे समोर आले आहे.

यासाठी संशयितांनी खून करत अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर एका महिलेस पत्नी असल्याचे बोगस वारस दाखवत तब्बल चार कोटींचा विमा स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या वर्षी 2 सप्टेंबर 2021 ला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ अशोक भालेराव मृत अवस्थेत आढळले होते. मात्र या घटनेत खून करून अपघात झाल्याचा बनाव रचत पाच संशयित आणि मयत व्यक्तीच्या विम्याचे तब्बल चार कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयतांना रात्री उशिरा मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 2 सप्टेंबर 2021 रोजी रात्री इंदिरानगर जॉगिंगच्या परिसरात रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. दुचाकी बाजूला पडलेली असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती अशोक रमेश भालेराव असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अनोळखी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करता सुरू केला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मयताच्या भावाने या अपघाताबाबत संशय व्यक्त करत तपास करण्याचे पोलिसांना पत्र दिले होते.

त्यानुसार पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरवत संबंधित घटनेची कागदपत्रे न्यायालयातून मागविण्यात आली. घडलेल्या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. मयत अशोक भालेराव यांच्या विम्याचे चार कोटी रुपये रजनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. संशयित महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने मंगेश सावकार याचा सहभाग असल्याचे सांगता इतर संशयितांची नावे सांगितली. पथकाने संशयित सावकार यास ताब्यात घेत चौकशी केली असता खून करून अपघात दाखवत विम्याची रक्कम एकमेकांत वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी संशयित मंगेश बाबुराव सावकार, रजनी प्रणव उके,  प्रणव साळवी यांच्या आणखी दोघांना ताब्यात घेत सावकारच्या दुचाकीच्या दिक्कीतून पिस्टलसह सहा काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

संशयितांनी यापुर्वी घातपात करत अपघात दाखवून अजून काही मयताच्या विम्याची रक्कम हडप केली असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यादिशेने आपला तपस सुरु केला आहे. त्यामुळे भविष्यात मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.

नक्की काय घडलं:
संशयित महिलेच्या नावे विम्याची रक्कम बँकेत जमा होती. यातील बहुतांशी रक्कम महिलेने संशयितांना वाटप केली होती. एका संशयिताला रक्कम कमी मिळाल्याने या टोळीत वाद झाले होते. या संशयिताने मयताच्या भावाला अपघात नसून घातपात असल्याची माहिती दिली आणि त्यातूनच कट रचल्याचे समोर आले.

सन २०१८-१९ साली मयत अशोक रमेश भालेराव आणि मंगेश बाबुराव सावकार, रजनी कृष्णदत्त उके,प्रणव राजेंद्र साळवी दीपक अशोक भारुडकर, किरण शिरसाठ, हेमंत वाघ या सर्वानी मिळून एक कट रचला. त्यामध्ये मयत अशोक भालेराव याची पत्नी म्हणून रजनी कृष्णदत्त उके हिचे नाव बदलून रजनी अशोक भालेराव ठेवून त्याबाबतचे सर्व कायदेशीर कागदपत्र तयार केली होती. तसेच, अशोक भालेरावांच्या नावाने चार कोटींचा विमा उतरविण्यात आला होता. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून करून अपघातात अशोक भालेराव मयत झाल्याचे दाखविण्यात येणार होते. मात्र, साडेतीन ते चार वर्ष उलटून देखील कट रचल्याप्रमाणे होत नसल्याने अशोक भालेराव याला अंधारात ठेवून त्याचाच खून करण्याचा पुन्हा कट रचला गेला आणि त्या पद्धतीने अपघाताचा बनाव करीत विम्याचे पैसे लाटण्यात आले असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

संशयितांनी खुन करुन अपघात दाखवल्याचेच तपासात निष्पन्न झाले असून,पोलिस कोठडीत संशयितांकडून खुनाचा कट कसा रचला विमा कशी प्रकारे वर्ग केला याचा तपास केला जाणार आहे .यातील अनेकांना विम्याचे पैसे कसे मिळवायचे याचे ज्ञान असल्याने यापूर्वी देखील त्यांनी असे काही कृत्य केले आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790