नाशिक: बर्निंग बस; शिंदे पळसे टोल नाक्यावर नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर…

नाशिक: बर्निंग बस; शिंदे पळसे टोल नाक्यावर नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर…

नाशिक (प्रतिनिधी): राजगुरूनगरहून नाशिककडे येणार्‍या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बस पेटली. मात्र दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शिंदे पळसे टोल नका येथे घडली.

या धडकेत राजगुरूनगरहून येणारी बस जळून पूर्ण खाक झाली असून, बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

खरं तर हा एक भीषण आणि विचित्र अपघात होता… या अपघाताचं सीसीटिव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की आज (दि. ८ डिसेंबर) दुपारी राजगुरूनगर डेपो येथून नाशिककडे एमएच 07 सी 7081 या क्रमांकाची बस येत होती. ही बस पळसेजवळ आली असताना त्या बसच्या पुढेच एमएच 14 बीटी 3635 या क्रमांकाची सिन्नर डेपोची बस उभी होती.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

त्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरूनगरच्या बसने समोर असलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरात धडक दिली. हा अपघात बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ते दोघे या दोन बसमध्ये दाबले गेले. समोरील बसला धडक दिल्यानंतर क्षणात राजगुरूनगरच्या बसने पेट घेतला. घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले; मात्र दुचाकीवरील दोघांचा या अपघातात नाहक बळी गेला.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

या घटनेचा थरारक व्हिडीओ इथे बघू शकता…

ही आग अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी विझविली. पळसे येथील दिलीप गायधनी, दिनेश गोवर्धने, दिनेश एखंडे, संदीप एखंडे, अंकुश गायधनी आदींनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यात संदीप एखंडे यांच्या हातात काच गेल्याने ते जखमी झाले आहेत. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790