Ad: Shop For Sale At Central Location of Nashik…
नाशिक (प्रतिनिधी): अंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच दोन सहकारी मित्रांनी अश्लील वर्तन करून अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विशेष म्हणजे त्याचे हे दोनही मित्रसुद्धा अल्पवयीन आहेत…
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला यांचा अल्पवयीन मुलगा हा दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातून शाळेत पायी जात असताना त्याला त्याचे मित्र भेटले.
त्यानंतर हे तिघे जण अंघोळ करण्यासाठी शिवाजीनगर येथे गेले. त्यानंतर संशयित दोन्ही विधिसंघर्षित बालकांनी संगनमत करून पीडित मुलाशी अश्लील चाळे केले.
त्यानंतर त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले, तसेच हा प्रकार पीडित मुलाने कोणाला सांगू नये म्हणून त्याच्या डोक्यात दगड मारून व गळ्याला ब्लेड मारून जखमी केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत विधिसंघर्षित बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना समज देऊन आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790