नाशिक: पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…

नाशिक (प्रतिनिधी): अ‍ॅपबाबत माहिती देऊन त्यावर पैसे भरल्यास दुप्पट होतील, असे आमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या एका अ‍ॅपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवेक ओम्प्रकाश सिंग यांनी एका लिंकवर क्‍लिक करून त्याचा आयडी व पासवर्ड तयार केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांना समोरील अ‍ॅपवर संपर्क करण्यासाठी कस्टमर केअर टेलिग्राम आयडी मिळाला. त्या अ‍ॅपबाबत माहिती देऊन त्यांना एकूण 30 स्टेप्स असल्याचे सांगितले.

त्यात एक-एक स्टेप पूर्ण केल्यावर आपण भरलेले पैसे दुप्पट होतील व त्यावर मिळालेले वेगवेगळे कमिशन अ‍ॅप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये जमा होतील. ते तुम्ही केव्हाही विथड्रॉवल करू शकता, असे वर्मा यांना संबंधित अ‍ॅपचालकाने सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

त्यानुसार वर्मा स्टेप पूर्ण करीत गेले असता त्यांच्या अ‍ॅक्सिस व एचडीएफसी बँकेच्या खात्यांवरून गुगल पे व फोन पेद्वारे 1 लाख 58 हजार 945 रुपये भरले. त्यानंतर त्यांना शंका आल्याने स्वत: वॉलेटमधून पैसे विथड्रॉवल करण्याचा प्रयत्न केला असता ते पैसे विथड्रॉवल झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी टेलिग्राम कस्टमर केअर/जीओएसएचओपी 66 यावर संपर्क केला असता त्यांनी वर्मा यांना पैसे परत देण्यास नकार दिला. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर्मा यांनी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित अ‍ॅपचालकाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खतेले करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790