महत्वाचे: नाशिककरांनो, दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडताय? या 7 मार्गांवर असेल वाहनांना बंदी

महत्वाचे: नाशिककरांनो, दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडताय? या 7 मार्गांवर असेल वाहनांना बंदी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांनो, तुम्ही जर दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

कारण, नाशिक शहर पोलिसांनी दिवाळी खरेदी काळात वाहतूक सुरळीत रहावी म्हणून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कारण, शहराच्या मुख्य बाजारपेठेतील एकूण ७ मार्गांवर वाहनांना बंदी राहणार आहे.

विशेष म्हणजे, हे आदेश आजपासूनच लागू झाले आहेत. येत्या २७ ऑक्टोबर पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

नाशिक पोलिस वाहतूक उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढलेल्या आदेशानुसार, शहरातील एकूण ७ मार्गांवर वाहन बंदी असेल. सकाळी ८ ते रात्री ११ या वेळात ती लागू असेल. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेन रोड, शालिमार याठिकाणचे काही मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे अन्य रस्त्यांचा वापर वाहनधारकांना करावा लागणार आहे, तसे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

हे मार्ग वाहनांना बंद:
मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजाकडे येणारी अवजड वाहने, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंटकडे येणारी वाहने, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेन रोड मार्गे धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मेन रोड कडे जाणारी वाहने, रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट..

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

हे असतील पर्यायी मार्ग:
मालेगाव स्टॅन्ड, मखमलबाद नाका, रामवाडी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे, जुने नाशिककडे ये-जा करण्यासाठी गंजमाळ सिग्नल, दूध बाजार, येथे पार्किंग सुविधा, गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, सांगली बँक सिग्नल, नेहरू उद्यान, कालिदास कला मंदिर समोरील पे अँड पार्क.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790