नाशिक: रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीच्या धडकेत दोघे भावंडे जखमी
नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद नाका भागात एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अनुक्रमे आठ व दहा वर्षांचे दोघे भावंडे जखमी झाले.
या घटनेत दोन्ही भावांच्या पायाचे हाड मोडले असून डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा जहांगीर (१०) व साहिल जहांगीर (०८ रा.दोघे पिझा दुकानाजवळ,क्रांतीनगर) अशी जखमी भावंडाची नावे आहेत.
- नाशिक: उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बुलेटस्वार मित्रांपैकी एकाचा मृत्यू; एक जखमी
- नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षे बलात्कार; ॲट्रॉसिटीन्वये गुन्हा दाखल
- Ad: Admission Open For 11th, 12th Biology And Biology NEET 2023-24 Batch
- Ad: नाशिक शहरात या ठिकाणी मिळतंय अस्सल काळ्या मसाल्याचे मटण भाकरी…!
याप्रकरणी वडिल प्रकाशकुमार मोहनलाल जहांगीर यांनी तक्रार दाखल केली आहे. कृष्णा व साहिल हे दोघे भावंडे गेल्या गुरूवारी (दि.६) आपल्या घराजवळील रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. दोघे भाऊ एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असतांना मखमलाबाद नाक्याकडून ड्रिमकॅसेलच्या दिशेने भरधाव जाणाºया दुचाकीने त्यांना ठोर मारली होती. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून कृष्णाचा गुडघ्यात तर लहानग्या साहिलचा डाव्या पायाचे हाड मोडले आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघा भावंडावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790