नाशिक: जावईबापूंचा प्रताप, सासुरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचे सोनं पळवलं!

नाशिक: जावईबापूंचा प्रताप, सासुरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचे सोनं पळवलं!

नाशिक (प्रतिनिधी): दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत.

अनोळखी, सराईत लोकांकडून चोरी होण्याच्या घटना तर घडतच असतात, मात्र आता घरातल्या माणसांकडून देखील आपल्याच घरात चोरी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

अशातच नाशिकमध्ये चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

दुसरा मुलगाच समजल्या जाणाऱ्या जावयाने सासुरवाडीतच धाडसी चोरी केली आहे.

बेरोजगार असलेल्या जावयाने सासूच्या घराची किल्ली चोरत तब्बल साडेदहा लाख रुपयांची चोरी केली केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संबंधित सासूला जावयाने चांगलाच फटका दिला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'आरटीओमध्ये नोकरी लावून देतो' सांगून 24 लाखांची फसवणूक

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून गंगापूर पोलिसांनी संशयित चोर जावयाला अटक करण्यात आली आहे. सासूने दिलेल्या तक्रारीवरुन गंगापूररोड पोलीस ठाण्यात जावयावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी साडे नऊ लाखांचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात गंगापूर रोड पोलीसांना यश आले आहे.

आलोक दत्तात्रय सानप असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो मखमलाबादरोड परिसरात राहण्यास आहे. तर सासू मीरा शशिकांत गंभिरे यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या धृवनगर येथील घरातून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती.

हे ही वाचा:  नाशिक: म्हस्के टोळीच्या म्होरक्याला गुंडाविरोधी पथकाकडून अटक !

दरम्यान गंगापूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली होती. त्यात तक्रारदार गंभीरे यांच्याच जावयाची देहबोली असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यांनी त्याला गंगापूर पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. जावई सानप याने चोरी केल्याच्यानंतर त्याच्याकडून 24 तासाच्या आतमध्ये साडेनऊ लाख रुपयांचे 249 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. संशयित आरोपी असलेला आलोक सानप याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या बेरोजगार आहे.

हे ही वाचा:  नाशिक कमाल तापमान ३७.५; आगामी ३ दिवस ३ अंशाने तापमान वाढणार

संशयित आरोपी असलेला आलोक सानप याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या बेरोजगार असून सासूरवाडीला त्याचे नेहमी जाणे येणे होते. काही दिवसांपूर्वी सासू मीरा शशिकांत गंभिरे यांनी ध्रुवनगर येथील बंद घराची किल्ली चोरून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यातच गंगापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली होती. त्यात तक्रारदार गंभीरे यांच्याच जावयाची देहबोली असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यांनी त्याला गंगापूर पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790