नाशिक शहर: शनिवारी (6 जून) अजून 20 पॉझिटिव्ह रुग्ण; दिवसभरात 27 रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी साडे सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने अजून २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. याआधी सायंकाळी साडे सहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ७ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शनिवारी दिवसभरात आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची संख्या २७ इतकी झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

सायंकाळी साडे सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये नाईकवाडीपुरा-२, पेठ रोड (पंचवटी)-२, पंडित नगर (सिडको)-२, कोणार्क नगर-१, मोठा राजवाडा (वडाळा)-३, जुने सिडको-१, देवळाली कॅम्प-१, नाईकवाडीपुरा (अजमेरी मस्जिद)-१, नाग चौक(पंचवटी)-१, भवानीप्रसाद रो-हाउस-१, जय भवानी नगर (टाकळी रोड)-१, विधाते नगर (अशोका मार्ग)-१, गंजमाळ-१ आणि सिन्नर फाटा (नाशिकरोड)-१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

तर सायंकाळी साडेसहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पंपिंग रोड-१, ठाकरे बंगला (गंगापूर रोड)-१, पंडित कॉलनी-१, माडसांगवी-१, दिंडोरी नाका-१, दारूल सलाम-१, सरदार चौक-१ यांचा समावेश आहे. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790