नाशिक: कॉलेजचे विद्यार्थी करत होते वन्यजीवांच्या अवयवांची विक्री! तिघांना अटक…

नाशिक: कॉलेजचे विद्यार्थी करत होते वन्यजीवांच्या अवयवांची विक्री! तिघांना अटक…

नाशिक (प्रतिनिधी): मुलांचे सध्याचे असलेले महागडे शौक मध्यमवर्गीय आई वडील प्रत्येक वेळी पूर्ण करू शकत नाही.

मात्र मुलं आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगली आहेत.

सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुलं ऑनलाईन गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले असल्याचं आपण बघतोय…

अशातच आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन तरुणांना वन विभागाने अटक केली आहे. 

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

नाशिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे बिबट्याची कातडी, चिंकाराचे आणि निलगायीचे शिंगे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी वन विभागाला मिळाली होती. वनविभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून संशयितांशी संपर्क साधला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या अवयवांची किमत २० लाख रुपये सांगण्यात आले होते. मात्र तडजोड करत ४ लाख रुपये देण्याचे ठरले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

मंगळवारी (२० सप्टेंबर) शहरातील उच्चभ्रू समाजल्या जाणाऱ्या कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ या तीन संशयित आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांसह रंगेहात अटक केली आहे.

संशयित आरोपींची चौकशी केली असता ते नाशिकमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याच उघड झालं आहे. त्यांचे अजून कुणी साथीदार आहेत का याचा पोलीस आता शोध घेत आहेत…

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

कोण आहेत हे तीन तरुण
वन विभागाने अटक केलेले तीनहि संशयित नाशिक शहरातील आहेत. यातील दोन तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एक तरुण बी. फार्मसी, तर दुसरा बी. एस. सी. करत आहे. तर तिसऱ्या तरुणाचा नाशिक शहरात खाजगी व्यवसाय आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here