नाशिक : 4 महिन्यापूर्वी झालेला रस्ता खचल्याने अपघात
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात भर पडली ती गॅस पाईप लाईनची…
या पाईप लाईन करिता शहरातील छोट्या मोठ्या गल्लीत रस्ते खोदण्याचे काम सुरु होते.
हे काम झाल्यानंतर काही ठिकाणी डांबरी रस्ते तयार न करता काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले
मात्र आता या काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचा दर्जा समोर आलाय. शहरात काँक्रिटचा तयार केलेला रस्ता खचून ट्रकचा अपघात झाला आहे.
जुन्या नाशिक मध्ये नाशिक महपालिकेने ठेकेदारामार्फत याठिकाणी सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरणाचा नवीन रस्ता तयार केला होता. रस्ता तयार होता असताना स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराबाबत महापालिकेला तक्रार केली होती. मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी (१२सप्टेंबर) दुपारी अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून गाडीचे नुकसान झाले आहे.
जुन्या नाशिक मध्ये असलेल्या बेकारीला लागणार कच्चा माल किंवा बेकरीचा माल नेण्यासाठी ट्रक नेहमी येत असतो. मात्र सोमवारी दुपारी माल भरलेला एक ट्रक येथून जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रकचा पुढच चाक रस्त्याला पडलेल्या भगदाडात अडकले होते. हा खड्डा इतका मोठा होता कि यातून ट्रक बाहेर काढणे शक्य नव्हते, त्यामुळे क्रेन बोलावून हा ट्रक बाहेर काढण्यात आला.
परिसरातील नागरिकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली असून ठेकेदावर कारवाई करण्याची करण्याची म्गणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.