नाशिक: ‘या’ भागात करा बाप्पाचे विसर्जन, एका क्लिकवर पाहा तुमच्या जवळचे ठिकाण
नाशिक (प्रतिनिधी): गणपती बाप्पाचे जोरदार स्वागत केल्यानंतर आता अनंत चतुर्दशी वेध सर्वांना लागले आहेत.
यंदा शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
त्या दिवशी सर्व गणेशभक्त लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत निरोप देतील.
बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात झालं. आता विसर्जन मिरवणूक देखील त्याचपद्धतीने थाटामाटात निघणार आहे. यंदा डिजेमुक्त मिरवणूक निघणार असून पारंपारिक वाद्य वाजवात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी नाशिक शहरात 3500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी, राज्य राखीव दलाचे 1000 जवान, गृहरक्षक दलाचे 1000 जवान आणि 100 जीवरक्षक तैनात असतील.
‘या’ ठिकाणी विसर्जन कुंडांची निर्मिती:
नाशिक महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.
विभागानुसार नैसर्गिक तलाव/कृत्रिम तलाव:
सिडको:
पिंपळगाव खांब वालदेवी घाट प्र.क्र. 31, गोत्रीद नगर जिजाऊ वाचनालय प्र. 243, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुने सिडको प्र.क्र.24, पवन नगर जलकुंभ हिरे शाळे जवळ प्र. क्र. 25, राजे संभाजी स्टेडीअम सिहस्थ नगर सिडको प्र.क्र 27, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा प्र. क्र. 28, डे केयर शाळा रामनगर राजीवनगर प्र.क्र. 31, राजे संभाजी महाराज व्यायामशाळे जवळ कर्मयोगीनगर प्र.क्र. 24.
नाशिक पश्चिम:
यशवंतराव महाराज पटांगण प्र. 13, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुतेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट, घारपुरे घाट
सातपूर:
गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी, चोपडा लोंस पूल गोदापार्क, चव्हाण कॉलनी परीची बाग, फॉरेस्ट नर्सरी गंगापूर रोड, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडी रोड, महात्मा नगर पाण्याच्या टाकी जवळ, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर, पाईप लाईन रोड रिलायंस पेट्रोल पंप जवळ, शिवाजी नगर धर्माजी कॉलनी, नंदिनी नासर्डी नदी पूल सातपूर अंबड लिंक रोड, नंदिनी नासर्डी नदी पूल आय. टी. आय पूल, शिवाजी नगर पाझर तलाव.
नाशिक पूर्व विभाग:
नैसर्गिक तलाव 1. लक्ष्मीनारायण घाट (प्र. क्र. 15), रामदास स्वामी मठ (प्र.क्र. 16),नंदिनी गोदावरी संगम ( प्र क्र. 23), लक्ष्मीनारायण घाट, प्र. क्र. 15, रामदास स्वामी मठ प्र.क्र. 16, रामदास स्वामी नगर लेन – 1, बस स्टॉप जवळ -1, प्र.क्र. 16,नंदिनी गोदावरी संगम, प्र. क्र. 16, साईनाथ नगर चौफुली, प्र.क्र. 23, डीजीपी नगर गणपती मंदिराजवळ (प्र.क्र. २३), शारदा शाळे समोर, राणेनगर, प्र. क्र. 308. कलानगर चौक, राजसारथी प्र.क्र. 30,नारायण बापू चौक, प्र. क्र. 17,चेहडी ट्रक टर्मिनल, प्र.क्र. 19, निसर्गोपचार केंद्र जयभवानीरोड प्र. क्र. 20
नाशिक रोड:
दसक घाट प्र. क्र. 18,चेहडी गाव दारणा नदी, प्र.क्र. 19,देवळाली गाव वालदेवी नदी, प्र.क्र. 22,विहितगाव वालदेवी नदी प्र.क्र. 22,वडनेर गाव वालदेवी नदी, प्र.क्र. 22,शिखरेवाडी ग्राउंड प्र.क्र. 20,गाडेकर मळा प्र.क्र. 21,मनपा शाळा क्र. १२५, प्र.क्र. 21, राजराजेश्वरी चौक सायखेडा रोड, प्र. 18, के. एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजी मार्केट, प्र.क्र.२०
पंचवटी:
म्हसरूळ सितासारोवर प्र. क्र. 1,नांदूर मानूर, प्र. क्र. 2, आडगाव पाझर तलाव, प्र.क्र. 2,तपोवन प्र.क्र. 3, रामकुंड परिसर प्र.क्र . 5,म्हसोबा पटांगण, प्र.क्र . 5,गौरी पटांगण, प्र.क्र . 5, टाळकुटेश्वर सांडवा, प्र. क्र. 5, राजमाता मंगल कार्यालय, प्र. क्र. 1, गोरक्ष नगर (RTO कॉर्नर), प्र.क्र. 1, RTO ऑफिस पेठरोड प्र.क्र. 1,कोणार्कनगर, प्र.क्र. 2, प्रमोद महाजन गार्डन प्र.क्र. 3, रामवाडी जॉगिंग track शेजारी प्र. 6
गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी 11 वाजेपासून परवानगी देण्यात आली आहे.तसेच मंडळानी सर्व नियमात करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.सर्व नागरिकांना त्यातच गणपती बाप्पाचे विसर्जन करावे असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.