नाशिकची सिटी लिंक बस वाहतूक ठप्प; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

नाशिकच्या क्षणाक्षणाची बातमी आता लाईव्ह.. इथे क्लिक करा…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

त्यामुळे शहरातील बस वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी हे आंदोलन पुकारलं आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १४ भरारी पथकांची संयुक्त मोहीम; आतापर्यंत ३८ गोवंश जनावरांची सुटका

यामध्ये ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी असून कंत्राटी कामगारांना तीन महिन्यापासून पगार न दिल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे शहरवासियांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. त्याचबरोबर आम्हाला तीन महिन्यापासून पगार देण्यात न आल्याचा दावा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. नाशिकमधील तपोवन येथील मुख्य डेपोत हे आंदोलन चालू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत १ लाख २० हजार रुपयांचा संशयित अन्नपदार्थ साठा जप्त

नाशिक महानगरपालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना केली होती. त्यानंतर ही बससेवा महापालिकेने आपल्याकडे घेतल्यानंतर कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे. “आम्ही गोंधळ करत नाही, आम्ही आंदोलन करत असून आमच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या येत आहेत.” असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790