नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): भद्रकालीतील खैरे गल्लीतील १८ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

गौरी मयूर भावसार (वय १८, रा. दीक्षित चाळ, खैरे गल्ली, जुने नाशिक) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

गौरी हिने शनिवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, तपासी पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिचा तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. सासरच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला आहे. त्यामुळे अंत्यविधीप्रसंगी नातलगांनी संशयितांना अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी मृत नवविवाहितेच्या सासू-सासऱ्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर अमरधाममध्ये तणावाच्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात

त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती मयूर भावसार सह ३ जणांवर गुन्हा (रजिस्टर क्रमांक: ०२१६/२०२२ प्रमाणे )दाखल करण्यात आला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790