Breaking: नाशिकरोडला शिवशाही, ओम्नी, डम्पर आणि सिटी लिंक बस यांच्यात विचित्र अपघात

Breaking: नाशिकरोडला चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या पोस्ट ऑफिस समोर (मिनी मार्केट) झालेल्या चार वाहनांचा विचित्र अपघात घडला.. सोमवारी (दि. २५ जुलै) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवशाही बस क्रमांक एम एस 14 GU 3109, मारुती व्हॅन (काळी-पिवळी) क्रमांक MH 15 E 4509, डंपर क्रमांक एम एस 15 E 3777 आणि सिटी लिंक बस क्रमांक  MH 15 GV 7846 या वाहनांचा अपघात झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आजपासून बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची 'ऑटो रिक्षा शिस्त मोहीम'

त्यात मारुती व्हॅन चा चक्काचूर झाला. पण सुदैवाने त्यात असलेल्या प्रवाशांचा जीव चमत्कारिकरित्या बचावला

व्हॅन चालक गोकुळ पवार, वय 40 (राहणार पिंपळगाव बाहुला) आणि प्रवाशी राजाराम महाजन (राहणार भुसावळ, वय 70) हे जखमी झाले आहेत.

दुपारी दोन वाजता शिवशाही बस ही नाशिकरोडच्या पोस्ट ऑफिससमोरून जात असताना कुणीतरी समोर आल्याने  बस चालकाने अचानक ब्रेक लावला.

त्याच्या मागे प्रवाशी घेऊन येणारी मारुती व्हॅन ने ब्रेक लावले. व्हॅनच्या मागे असलेल्या डम्परने सुद्धा ब्रेक लावला त्यामुळे डंपरच्या मागून येणाऱ्या सिटी लिंक बसने डंपरला जोरात धडक दिली. डंपर समोर असलेली ओमनी व्हॅन शिवशाही बस आणि डम्पर या दोन वाहनांमध्ये दाबली गेल्याने व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

पण त्यातले प्रवाशी सुदैवाने बचावले, व्हॅन बाहेर काढण्यासाठी जेसीबी ने शिवशाही बस मागून उचलून घ्यावी लागली. गोकुळ पवार आणि राजाराम पवार या दोन्ही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश नहायदे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील त्वरित आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले आणि वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

यावेळी अपघात बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here