‘वापरलेल्या तेलात पदार्थ तळले तर याद राखा’, नाशिक एफडीएची आस्थापनेवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): एकदा वापरलेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे व्यावसायिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहेत.

आनंदवल्ली परिसरातील रॉयल बेकर्स या आस्थापनेवर सोमवारी (दि. १८) सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून आरोग्यास अपायकारक ठरणारे तेल जप्त केले आहे.

या तेलाची टीपीसी यंत्राद्वारे तपासणी केली असता त्याचे रीडिंग ३९.५ आले असून ते खाण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काढला.

⚡ हे ही वाचा:  चार दिवस पावसाचे: हवामान विभागाकडून अलर्ट जारी.. 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट !

पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध हॉटेल्स व खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी शहरात प्रथमच टोटल पोलर काउंट यंत्राद्वारे हॉटेलमध्ये वापरणाऱ्या खाद्यतेलाचे टोटल पोलर कंपाउंडचे रीडिंग घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कारवाईच्या पहिल्याच टप्प्यात रॉयल बेकर्समध्ये ३९.५ रीडिंग आले असून ते मुळात २५ पेक्षा कमी असायला हवे होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिकहून पुणे, धुळ्यासाठी दर १५ मिनिटांनी जादा बस

अन्न प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सरकारी अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाचा दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवला

जास्तीत जास्त तीन वेळा करता येतो वापर : खाद्यतेल तळणासाठी जास्तीत जास्त तीन वेळा वापरणे योग्य असते, परंतु बरेच अन्न व्यावसायिक एकदा सकाळी टाकलेल्या तेलाच वापर दिवसभर अथवा वारंवार करत असतात. इतकेच नव्हे तर त्याच तेलात पुन्हा दुसरे तेल मिक्स करतात. त्यामुळे तेलाची पोलर कंपाउंड वाढून ते तेल खाण्यास अयोग्य होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790