नाशिक: १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक: १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या अंबड येथील संजीव नगर परिसरात चार जणांनी एका तरुणाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना रात्री घडलीये.

दरम्यान, वेळीच उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला.

गळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडत असताना उपस्थित नागरिक त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

हे ही वाचा:  नाशिक: होळी अन रंगोत्सव साजरा करतांना सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन

तो तरुण बराच वेळ विव्हळत होता. त्यानंतर काही वेळाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11063,11061,11053″]

रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तरुण मदतीच्या प्रतिक्षेत विव्हळत असतानाचा असंवेदनशील नागरिकांनी त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला.

सदरे आलम शब्बीर शेख (वय १९), रा. दरभंगा, बिहार असे या मृत तरुणाचे नाव आहे. अंबड लिंक रोडवरील संजीव नगर मधील जत्रेत ही घटना काल (दि. ५ जुलै) रात्री 9 वाजता घडली. या घटनेतील अनोळखी टोळके पसार झाले आहेत. सदर खून कुणी व कुठल्या कारणामुळे केला याचा आता तपास सुरु आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

संजीव नगर येथील राहणारा सदरे आलम याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याचा गळ्यातील कंठच चिरल्याने त्याला बोलता येणे कठीण झाले होते. बोलता येत नसल्याने संशयितांचे नाव निष्पन्न करण्यास पोलिसांना अडचण आली. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री साडेबारा वाजता त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तपास करत होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790