नाशिक: अंडा रोलच्या ऑर्डरला उशीर का होतोय विचारले म्हणून ग्राहकाला मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या आडगाव परिसरातील जत्रा हॉटेल समोर असलेल्या एका अंडारोलच्या गाडीवर ऑर्डर उशिरा दिल्याने 30 मे रोजी रात्री 9. 30 वाजेच्या सुमारास ग्राहक आणि विक्रेता यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
याप्रकरणी 31 मे रोजी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑर्डर उशिरा देण्याच्या कारणावरून ग्राहक आणि विक्रेता यांच्यात वाद झाला.
या घटनेचे पर्यवसन हाणा मारीत होऊन विक्रेता व त्याच्या साथीदारांनी ग्राहकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
या प्रकरणी आडगाव पोलिस स्थानकात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी अजिंक्य तानाजी लभडे वय २६, रा. लोकधारा सोसायटी, कोणार्कनगर, आडगाव हा जत्रा हॉटेल परिसरातील एस. बी. आय. बँकेजवळील एका अंडा रोलच्या गाडीवर आला होता.
अजिंक्यने अंडा रोलची ऑर्डर सांगितली. ऑर्डर येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे अजिंक्यने ऑर्डरला उशीर का करता अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने विक्रेत्याने आपल्या काही साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. विक्रेत्याच्या साथीदारांनी अजिंक्य यास शिवीगाळ केली. एका संशयित आरोपीने अजिंक्य याच्या डोक्यात डोक्यात दगड टाकला. इतर साथीदारांनी बांबू आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने अजिंक्य याच्या दोन्ही हातांना आणि डाव्या पायाला मार हाण करून जखमी केले. तसेच वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित सुशांत नाठे याच्यासह त्याच्या सहा ते सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.