नाशिक: पाण्याची मोटार चालू करतांना शॉक लागून महिलेचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): ईलेक्ट्रिक पाण्याची मोटार चालु करत असताना शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सातपूर येथील महादेवनगर भागात हा प्रकार शनिवारी सकाळी घडला.
सातपूरच्या महादेवनगर येथे राहणाऱ्या सुनिता गौतम पगारे (वय ४०, रा. महादेव नगर सातपूर) ह्या रोजच्याप्रमाणे पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर चालु करण्यासाठी गेल्या होत्या.
- नाशिक: पिता- पुत्र जगदीश आणि प्रणव जाधव यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा…
- नाशिक मुंबई महामार्गावर पूल चढतांना कार पलटी होऊन अपघात; प्रवासी बचावले
त्यावेळी आर्थिंग वायरचा अंदाज न आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत केले. या घटनेबाबत सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ह्या घटनेने सातपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयताच्या पश्चात पती गौतम पगारे, दोन मुले, तिन मुली, असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोलिस नाईक बेंडकुळे, करीत आहे.