नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप येथे झालेल्या हत्येचा उलगडा; तीन संशयित ताब्यात

नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप येथे झालेल्या हत्येचा उलगडा; तीन संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पुणे रोडवरील पौर्णिमा बस स्टॉप येथे आज पहाटे झालेल्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना जेरबंद केले आहे. तर, एक संशयित फरार आहे.

यासंदर्भात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे

आज पहाटे हरीश भास्कर पाटील या इसमाचा मृतदेह पौर्णिमा बस स्टॉप येथे आढळून आला होता.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

दगडाने ठेचून या इसमाची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा कयास होता. मृत व्यक्ती ही पुणे येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले होते.

मृताच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने त्यांची ओळख पटली. लुटमारीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तातडीने पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे हे स्पष्ट झाले की, चार ते पाच जणांच्या टोळक्याने हरीश यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

हे ही वाचा:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: नाशिक जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

या हत्येबाबत पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हरीश भास्कर (४४, रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिम रंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारजे जकात नाका, पुणे) यांचा मृतदेह पौर्णिमा बस स्टॉपसमोर आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ३ संशयितांना अटक केली आहे. तर एक जण अद्याप फरार आहे. हा खून किरकोळ बाचाबाची वरून झाला असल्याचे दिसून येते. संशयित आरोपी आणि मयत हरिश यांची कुठल्याही स्वरुपाची ओळख नव्हती. मात्र संशयित हे नशेत होते. त्यामुळे नशेतच त्यांनी हरीश यांची हत्या केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790