नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप येथे पहाटे दगडाने ठेचून एकाची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक (प्रतिनिधी): शहरात पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका इसमाची तीन जणांनी मिळून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

नाशिक पुणे रोड वरील पौर्णिमा बस स्टॉप येथे हा प्रकार घडला.

हत्येचे ठोस कारण मात्र अजून समजू शकलेले नाही.

सदर प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

म्हसरूळला तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी पौर्णिमा बस स्टॉप  येथे पुण्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह ठेचलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

अधिक वृत्त असे की, आज (दि.२०) पहाटे चार वाजेच्या सुमारास टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच हरीश भास्कर पाटील (४९,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारज जकात नाका, पुणे) यांचा मृतदेह आढळून आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वपोनी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता मयत पाटील यांना दगडाच्या सहाह्याने मारले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून भद्रकाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here