नाशिक: अल्पवयीन मुलींचे विवस्त्र फोटो पॉर्न साईटवर व्हायरल करणाऱ्यास सक्तमजुरी

नाशिक: अल्पवयीन मुलींचे विवस्त्र फोटो पॉर्न साईटवर व्हायरल करणाऱ्यास सक्तमजुरी

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना घरी बोलावत त्यांचे विवस्त्र फोटो मोबाइलमध्ये काढून पॉर्न साइटवर व्हायरल करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सक्तमजुरी आणि तीन लाखांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

शुक्रवारी (दि. ६) मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांनी ही शिक्षा सुनावली.

अक्षय श्रीपाद राव (२८, रा. शिवायतन बंगला, खोडेनगर, इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

पाच जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यात ही पहिलीच शिक्षा ठरली आहे.

अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, जुलै २०१६ ते १२ जून २०१७ या कालावधीत आरोपी अक्षय रावने त्याच्या ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलींशी मैत्री केली. त्यांना घरी बोलावून लपून त्यांचे विवस्त्र फोटो व व्हिडिओ मोबाइलवर काढले.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन निरीक्षक अनिल पवार यांनी गुन्ह्याचा तपास केला. आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा केले गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून अॅड. सुधीर सपकाळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी आर. ए. खकाळे, जी. ए. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

मुलींचे फोटो पॉर्न साइटवर विक्री करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने पीडित मुलींनी पोलिसांत धाव घेतली. आरोपीच्या सखोल चौकशीत फोटो विक्री करण्याचा हेतू समोर आला. – अनिल पवार, तत्कालीन तपासी अधिकारी, सायबर पोलिस ठाणे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790