नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगर, कॉलेजरोड मार्गे निमाणी चक्री बससेवा ‘या’ दिवशी सुरू होणार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक परिवहन महामंडळातर्फे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवार, ३ मे पासून नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगर, कॉलेजरोड मार्गे निमाणी अशी चक्री बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
पंचवटी एक्प्रेसच्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीला यश आले असून, नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. याबद्दल महापालिकेचे आभार मानण्यात आले आहे.
जुने सिडको, बडदेनगर, काशिकोनगर, सद्गुरूनगर, गोविंदनगर, बाजीरावनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, प्रियंका पार्क, कालिका पार्क, उंटवाडी, जगतापनगर या भागातील रहिवाशी, विद्यार्थी यांना शाळा, महाविद्यालय, शिकवणी व इतर कामांकरिता जाण्या-येण्यासाठी या बसचा उपयोग होईल. नाशिकरोड, द्वारका, मुंबई नाका, गोविंदनगर, सिटी सेंटर मॉल, महात्मानगर, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन मार्गे ही बस सीबीएस, रविवार कारंजा, निमाणीला जाईल, तेथून ती पुन्हा याच मार्गाने म्हणजे कॉलेजरोड, गोविंदनगर मार्गे नाशिकरोडला जाईल. पहिली बस निमाणीहून सकाळी सहा वाजता सुटेल, सात वाजता नाशिकरोडला पोहचेल. नाशिकरोडहून शेवटची बस रात्री पावणेदहाला निघेल, पावणेअकराला निमाणीला पोहचेल.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, संजय टकले, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, सुनिता उबाळे, मीना टकले, शीतल गवळी, सुलोचना पांडव, रूपाली मुसळे, अपर्णा खोत, चित्रा रौंदळ, मिनाक्षी पाटील, मनोज वाणी, श्रीकांत नाईक, डॉ. शशिकांत मोरे, अशोक पाटील, शैलेश महाजन, दीपक दुट्टे, मनोज पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, गुलाबराव शिंदे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय डोंगरे, ओमप्रकाश शर्मा, स्नेहलता सोनवणे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, बाळासाहेब राऊतराय, वैभव कुलकर्णी, मगन तलवार, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, किरण काळे, हरिष काळे, कुणाल महाजन, बन्सीलाल पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदींसह रहिवाश्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांचे आभार मानले आहेत.
*नाशिकरोडहून निमाणीसाठी सुटणार्या बसची वेळ : सकाळी ६, ७, ८.२०, ९.२०, १०.५०, दुपारी ३.५०, ४.५०, सायंकाळी ६.३०, ७.१० व रात्री ९.४५ वाजता.
*निमाणीहून नाशिकरोडसाठी सुटणार्या बसची वेळ : सकाळी ५.४५, ७.१०, ८.१०, ९.४०, १०.४०, दुपारी २.४०, सायंकाळी ५.२०, ६, ७.४० व रात्री ८.२० वाजता.