
नाशिक: चारित्र्यावर संशय घेऊन अल्पवयीन प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन प्रेयसीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दिलीप सुरेश थाटसिंगार (वय 26, रा. कथडा, भद्रकाली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप थाटसिंगारने त्याच्या 17 वर्षीय प्रेयसीच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले.
नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. वारंवार अत्याचार व तिच्या चारित्र्यावर संशय घेत दिलीपने तिला बेदम मारहाण केली.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10570,10568,10564″]
२ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलीपने पीडितेचे हात पाय बांधून तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात पीडितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडितेच्या भावाच्या फिर्यादीनुसार दिलीपविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात खुन, बलात्कार, अपहरणासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. भद्रकाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हा खटला न्यायाधिश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयात सुरु होता. सरकारतर्फे अॅड. दिपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करीत बारा साक्षीदार तपासले. दिलीप विरोधात खुनाचा गुन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने त्यास जन्मठेप आणि दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790