नाशिक: उड्डाणपुलावर डिव्हाईडरवर धडक लागून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नाशिक: उड्डाणपुलावर डिव्हाईडरवर धडक लागून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या मेडिकल कॉलेजच्या ब्रिज वर बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास डिव्हाईडरवर मोटार सायकल आदळल्याने एका साठ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी मानोरी येथील शैक्षणिक संस्थेची जागा थेट खरेदीद्वारे संपादित

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दत्तू धोंडिबा माळी वय 60 वर्ष राहणार नांदूरगाव पोस्ट माडसांगावी तालुका नाशिक. हे स्वतःच्या मोटार सायकलने मंगळवारी 20 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ओझर हुन नाशिक कडे त्यांच्या वैयक्तिक कामाकरिता निघाले होते.

नाशिक जवळ आल्यावर त्यांनी सर्व्हिस रोडने न जाता आडगाव जवळील मेडिकल कॉलेज समोरून जाणाऱ्या उड्डाण पुलावर चढले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पूर्वी दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10511,10508,10499″]

गाडीचा वेग जास्त असल्याने रस्त्यावरील डिव्हाडरला जाऊन आदळले. यात त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती दत्तू माळी यांच्या घरी कळताच त्यांचे जावई पांडुरंग सोनवणे घटना स्थळी आले. दत्तू माळी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र माळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. अपघाताबाबत पोलीस ठाण्यात कळविले असता आडगाव पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790