नाशिक: पाथर्डी फाट्याजवळ कंटेनर आणि आयशरचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

नाशिक: पाथर्डी फाट्याजवळ कंटेनर आणि आयशरचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी):नाशिक शहरातील पाथर्डी फाटा जवळील वासन टोयोटा शोरूम समोरील उड्डाणपुलावर कंटेनर आणि आयशर गाडीचा अपघात झाला आहे.

उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेग असलेला आयशर ट्रक आदळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात आयशर गाडीच्या चालकाचा जगीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रविवारी (दि. ३ एप्रिल) रोजी रात्री 22.30 वाजेच्या सुमारास आग्रा- मुंबई महामार्गाच्या टोयोटा शोरूमच्या समोरील उडाणपुलावर नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्रिजवर कंटेनर क्र. MH 04 GR 6513 वरील चालकाने त्याचे ताब्यातील कंटेनर अविचाराने, हयगयाने रस्त्याचे मध्ये उभा केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

तसेच कुठल्याही प्रकारचे पाठीमागे रिफ्लेक्टर न लावता, तसेच स्वत: हाताने ईशारे न करता रस्त्यामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होईल या उददेशाने कंटेनर उभा केला. रस्त्यात कंटेनर उभा केल्याने पाठीमागुन येणारी आयशर टेंम्पो क्र एम.एच MH 04 JU 5432 ही त्यावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की आयशर गाडीचा समोरचा पूर्ण भाग चक्काचूर झाला होता. यात चालक आणि क्लिनर अडकले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढण्यात आले. अपघातात आयशर टेंम्पोचा चालक रामकेश रामज्ञान चौधरी वय 36 वर्ष आणि क्लिनर मुकेश गोदारा वय. 23 वर्षे दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघानाही  उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आयशर चालक रामकेश चौधरी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर क्लिनर मुकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबड पोलीस ठाण्यात याबाबत ४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ५.१२ वाजता या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here