नाशिक: बहिणीच्या लग्नपत्रिका वाटपासाठी गेलेल्या दोघा भावांचा अपघाती मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): बहिणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बहिणीच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या महाजे येथील सोमनाथ वसंत भोये (३२) व जगन पोपट भोये (२६) या चुलतभावांचा अपघातात मृत्यू झाला.
महाजे येथील सरपंच वसंत भोये यांच्या मुलीचे लग्न होते.
दिवसभर बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून सोमनाथ हा चुलतभाऊ जगनसह रात्री घरी गोळशी फाट्याच्या दिशेने जात होते.
चाचडगावजवळ रात्री चालक अनिल सुरेश निकम (रा. साक्री) याने आपल्या ट्रकने (एमएच १८, एजे ५३९५) दुचाकीवरील (एमएच १५, एचबी १५३०) या दोघा भावांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले असताना झालेल्या या घटनेने दिंडोरी तालुक्यातील महाजे, गोळशी, ननाशी या परिसरामध्ये शोककळा पसरली असून यासंदर्भात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार करत आहेत.
- नाशिक: ‘या’ पोलीस चौकीतच रंगली ओली पार्टी; तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना मारहाण
- नाशिक: ओव्हरटेकच्या घाईमुळे भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; पाऊण तास मृतदेह रस्त्यावर…
- नाशिक: दुचाकी आणि इंडिकाच्या धडकेत युवक गंभीर जखमी.. घटना सीसीटीव्हीत कैद (VIDEO)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790