नाशिक: ओव्हरटेकच्या घाईमुळे भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; पाऊण तास मृतदेह रस्त्यावर…

नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबादमार्गे मानकर मळा चौफुलीवरून पुढे दिंडोरी रोडकडे जातांना पाठीमागून भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हयगय केली.

वाहन दामटवून ओव्हरटेकचा प्रयत्न केला.

यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली.

या दुर्दैवी घटनेत ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

सोमवारी (दि. १४ मार्च) सायंकाळी जवळपास साडेपाच वाजेच्या सुमारास अरुण भगवान गवळी (वय: ५२, राहणार खेडगाव, दिंडोरी) हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ डीडी ७२७६) प्रवास करत होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच १५ एके १११८) गवळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात ट्रकचालकाच्या ओव्हरटेक करण्याच्या अतिघाईमुळे झाला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10161,10158,10154″]

दुचाकीला धडक बसल्याने गवळी रस्त्यावर कोसळून ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडले गेले. या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिस पाऊण तासानंतर आले असे नागरिकांचे म्हणणे आहे. तोपर्यंत गवळी यांचा मृतदेह रस्त्यावर तसाच पडून होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात ट्रकचालक दिलीप पंढरीनाथ रासे (वय: ५०, राहणार संताजी नगर, बजरंगवाडी, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉 इथे किराणा मालावर मिळतोय भरघोस Discount ! संधी चुकवू नका !

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here