नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (29 मे 2020) रात्री ९.४० वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात पेठरोड (राहुल वाडी)-1, अंबड लिंक रोड-1, कठडा (जुने नाशिक)-1, दिपाली नगर-4, आयटी पार्क (व्हीनीस सोसायटी, वडाळा)-7, अजमेरीचंद (नाईकवाडी)-3 यांचा समावेश आहे. सदर रुग्णांचे सविस्तर रहिवासी पत्ते अधिकृतरित्या अजून प्राप्त झालेले नाहीत. प्राप्त झाल्यास लगेच प्रसिद्ध करू. म्हणजेच आज दिवसभरात एकूण २७ कोरोनाबाधित रुग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790