गुंगीचं औषध देऊन विवाहितेवर बलात्कार, गर्भपात; नाशिकच्या ‘ह्या’ मेकअप आर्टिस्टला अटक

गुंगीचं औषध देऊन विवाहितेवर बलात्कार, गर्भपात; नाशिकच्या ‘ह्या’ मेकअप आर्टिस्टला अटक

नाशिक (प्रतिनिधी): गुंगीचं औषध देऊन विवाहितेवर बलात्कार, त्यानंतर घडलेल्या प्रकारचे फोटो तिच्या पतीला दाखविण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार आणि मग तिचा गर्भपात..हा प्रकार घडलाय नाशिकमध्ये.

विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मेकअप क्लासेसचा संचालक संशयित ललित निकम याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 1 मे 2019 रोजी पंचम हॉटेलजवळ कामानिमित्त फिर्यादी पिडीत महिला ही संशयित आरोपी एन ललित मेकअप क्लासेसचा संचालक ललित निकम (वय 49, रा. भागवत अपार्टमेंट, काठे गल्ली, द्वारका, नाशिक) यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीत बसलेली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

त्यावेळी आरोपी ललित निकम याने या महिलेला गुंगीचे औषध असलेले कोल्ड्रिंक्स पाजले.

व आर्चिस गॅलरीच्या मागे पराग अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर असलेल्या सलूनमध्ये नेले. तेथे महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यादरम्यान काढलेले फोटो महिलेला दाखविले.

हे फोटो फिर्यादीच्या पतीला शेअर करण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेसोबत वेळोवेळी जबरी लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक अत्याचार केले. त्यातून मे 2021 मध्ये या महिलेला गर्भधारणा झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

त्यानंतर दि. 28 जुलै 2021 रोजी गंजमाळ येथील वाघ हॉस्पिटल येथे ललित निकम याने फिर्यादी महिला त्यांची पत्नी असल्याचे सांगून व कागदपत्रात तशी नोंद करून महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडून गर्भपात केला.

विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी आरोपी ललित निकम याची पत्नी नेहा निकम, आरोपीचे मित्र जयेश वाघ व त्याची पत्नी ज्योती वाघ यांनी पीडित महिलेला धमकावले होते. गर्भपातानंतरही आरोपी ललित निकम याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून विवाहितेला त्रास दिला.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

दरम्यान हा प्रकार दि. 1 मे 2019 ते 28 जुलै 2021 दरम्यान कॉलेज रोड, द्वारका, नाशिक,  येथे घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376 (2) (N), 377, 328, 313, 506, 34 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0042/2022) संशयित आरोपी ललित निकम याला अटक केली आहे. त्याचप्रमाणे  जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here