कापडणीस पिता-पुत्र हत्याकांड: राहुल जगतापच्या या तीन साथीदारांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या कापडणीस पिता पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी राहुल जगतापच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
नानासाहेब कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांड प्रकरणांमध्ये या आज नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी नवीन खुलासा केलाय.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा अमित कापडणीस यांची हत्या डिसेंबर महिन्यात टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती.
त्यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कापडणीस पिता-पुत्र मिसिंगची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
- घरात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; आजीच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
- Breaking: सुरज मांढरे यांची बदली; गंगाधरन डी नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी
मात्र यासंदर्भात पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत राहुल जगताप या युवकाला अटक करत तपास केला. संपत्तीच्या हव्यासापोटी राहुल जगताप याने कापडणीस पिता-पुत्राची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. आता राहुल जगताप याला मदत करणाऱ्या विकास हेमके,प्रदीप शिरसाठ, सुरज मोरे या तीन आरोपींना नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी काल रात्री उशिरा औरंगाबाद मधुन अटक केलीये. कापडणीस पिता पुत्रांची हत्या पूर्वनियोजित असून नानासाहेब कापडणीस यांची संपत्ती राहुल जगताप आणि त्याचे 3 साथीदार यांनी हडप करण्यासाठी केल्याचा खुलासा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी केला आहे.