नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथे सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे.
रोशन खाडम असे या मुलाचे नाव आहे.
या हल्ल्यात रोषण हा हा गंभीर जखमी झाला आहे.
मात्र आजीच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळून गेला आणि मुलाचे प्राण वाचले.
मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकारामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. घरात घुसून हल्ला करणाऱ्या या बिबट्याला मात्र आजीच्या धाडसामुळे धूम ठोकावी लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुगारवाडी हा एक भाग आहे. या भागात अगोदरही बिबट्याचे हल्ले झाले आहेत.
- निवडणूक आणि पैसा: चर्चा करण्याच्या बहाण्याने तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
- नाशिक: व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटील यांना ‘एनसीएफ’चा आउटस्टँडींग सिटीझन पुरस्कार!
मंगळवारी (दि. ८ मार्च) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुगारवाडी येथे रोशन खाडम या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी रोशन हा घरात खेळत होता. त्याच्यासोबत त्याची आजी सुद्धा घरातच होती. बिबट्या सायंकाळी घरात शिरला आणि समोर असलेल्या रोशनवर अचानक हल्ला केला. बिबट्याने रोशनच्या मानेचा लचका घेतला. रोशनच्या ओरडण्याने आजी धावत आली. यावेळी आजीने धाडस दाखवत आरडाओरड केली आणि प्रतिकार केला. आजीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले.. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. रोशनवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.