नाशिक (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे.
नाशकातील के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाटाच्या पाण्यात मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अभिषेक कैलास खरात असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
हा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचातातडीने त्याचा शोध घ्यावा, असे आदेश केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोलिसांना दिले होते.
पण दुर्दैवाने आज तालुक्यातील सय्यैद पिंपरी येथे पाटाच्या पाण्यात त्याचा मृतदेह सापडला आहे.
त्यानं आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात घडला? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अभिषेक खरात असं संबंधित तरुणाचं नाव असून तो के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.
- नाशिक: 25 वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; महिलेने केले आत्महत्येस प्रवृत्त! मृतदेह महामार्गावर
- नाशिक: दहावीच्या विद्यार्थ्याला प्राचार्यांकडून काठीने मारहाण; उपनगर पोलिसांत तक्रार
- नाशिक: फायनान्सची नोकरी गेली तर पठ्ठ्याने दुचाकी चोरी सुरु केली; २० दुचाकी हस्तगत
२६ फेब्रुवारीपासून अभिषेक अचानक गायब झाला होता. यानंतर मृत अभिषेकचा चुलत भाऊ सूरज खरात यानं आडगाव पोलीस ठाण्यात चुलत भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस अभिषेकचा शोध घेत होते. दरम्यान हे प्रकरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना समजल्यानंतर त्यांनी प्रकरणाचा तातडीनं तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मृत अभिषेक हा रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मृत अभिषेकनं आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात घडला? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस चहुबाजूने या घटनेचा तपास करत आहेत. त्याअनुषंगाने अडगाव पोलीस मृत अभिषेकच्या मित्रांची चौकशी करून मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा पुढील तपास अडगाव पोलीस करत आहेत.