संशोधनातून तयार केले विश्व- आयुष कषाय टॅब; नाशिकच्या आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार

नाशिक (प्रतिनिधी): आयुर्वेदिक चिकित्सेचा अंतर्भाव असणाऱ्या आयुष मंत्रालयाने कोविड – १९ साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आयुर्वेदीक औषधे वापरण्याबाबतचे निर्देश व मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. याच अनुषंगाने काही नवीन वनस्पती, औषधे यांची जोड देऊन संशोधन करून आताच्या परिस्थितीमध्ये उपयोगी असे ‘विश्व- आयुष कषाय टँब’ नावाचे औषध डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी डॉ. संदीप पाटील, डॉ. रविभुषण सोनवणे, डॉ. आतिष ओस्तवाल, डॉ.शैलेश निकम आणि डॉ. समर्थ देशमुख यांच्या सहकार्याने तयार केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

विश्वगंध आयुर्वेद ह़ॉस्पीटल व रिसर्च सेंटर, माणिक नगर, गंगापुररोड यांच्या माध्यमातून संशोधनपुर्वक तयार केलेल्या ‘विश्व-आयुष कषाय टॅब’ या औषधामधील सर्व घटक वनस्पती नैसर्गिकरित्या व्याधीविरोधात प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या आहेत. तसेच प्रतिजैविक व जीवाणु, विषाणु प्रतिकारक गुणधर्म किंवा क्षमता असलेल्या औषधांचा यात वापर असल्याने संसर्गजन्य जागेत अधिक काळ असणा-यांनी किंवा संसर्ग झाल्यास किंवा त्यासारखी लक्षणे किंवा त्रास दिसत असल्यास या औषधांमुळे आजार लवकर आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे यातील काही वनस्पती विषाणुची वाढ तसेच तत्सम प्रतिकृती, प्रतिनिर्मिती तयार करण्यास प्रतिबंध करणाऱ्या असल्याने वारंवार होणारा संसर्ग टाळण्यास मदत होईल असा विश्वास डॉ. तुषार सूर्यवंशी व डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

‘विश्व- आयुष कषाय टँब चा वापर सारी, कोरोना, सर्व प्रकारचे ताप, सर्व जीवाणू व विषाणुजन्य आजारात उपयोग करता येईल. नैसर्गिक रित्या व्याधी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोग होईल. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह याबाबत वरील डॉक्टर्सनी सविस्तर चर्चा केली आहे. त्यासंदर्भातील शोधनिंबध व विश्व आयुष कषाय टॅब औषधाचे नमुने मांढरे यांना सुपुर्त करण्यात आले. तसेच सदर आयुर्वेदीक औषधांचा अंतर्भाव कोरोना व्याधीच्या प्रतिकार व उपचारांमध्ये करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. सोबतच जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, अधिकारी आदींना या औषधांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांना सदरचे औषध विश्वगंध आयुर्वेद ह़ॉस्पीटल व रिसर्च सेंटर, माणिक नगर, तोरणा पॅलेस, गंगापुररोड, नाशिक येथे सकाळी ११ ते ७ या वेळेत नाममात्र शुल्कांमध्ये उपलब्ध आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790