नाशिक Viral Video : दुचाकीला कारची धडक, महिलेला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
नाशिक (प्रतिनिधी): सटाणा शहरातील गंगाराम कॉलनीच्या समोरील मालेगाव रस्त्यावर आज गुरुवार (ता.१७) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५५ वर्षीय महिलेचा मुत्यु झाला आहे.
हा अपघात (Accident) इतका भयंकर होता की कारच्या पुढील भागात महिला अडकल्याने कारने महिलेला तब्बल ३० फूट फरफटत नेले.
अंगावर शहारा आणणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याबाबत सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निर्मला शिवाजी सोनवणे (वय ५५, रा.गंगाराम कॉलनी, सटाणा) या आपला मुलगा प्रशांत शिवाजी सोनवणे (वय ३६) याच्यासोबत दुचाकी (MH-41-Z-4793) वरून सावकी येथील मळ्यात जाण्यासाठी सटाणाच्या दिशेने निघाल्या होता. याचवेळी गंगाराम कॉलनीतून संजय बारकू सोनवणे (४५, रा. बाजार समिती जवळ, मालेगाव रोड, सटाणा) हे आपल्या कारने (MH-41-AZ-6725) मालेगाव रस्त्याच्या दिशेने येत होते.
- Breaking: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड, संदीप वाजेचा ‘हा’ साथीदार गजाआड
- नाशिक: अंत्यविधीहून परतणाऱ्या पती पत्नीचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू
अचानक संजय सोनवणे यांचा कारवरील ताबा सुटला आणि मालेगाव रस्त्यावर महिंद्रा शोरूमसमोर मालेगावकडे जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनवणे यांच्या कारला (MH-14-BR-7331) उजव्या बाजूला निसटती धडक दिली. याचवेळी प्रशांत सोनवणे यांच्या दुचाकीला सुद्धा संजय सोनवणे यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या निर्मला सोनवणे या दुचाकीवरून रस्त्यावर जोरात खाली पडल्या आणि कारच्या पुढील चाकांच्या खाली आल्या. यावेळी कारने त्यांना तब्बल ३० फूट पूढे रस्त्यावर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.