नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पीएम बस योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पालिकेच्या पदरात पडणाऱ्या ५० इलेक्ट्रिक बसेससाठी मंजूर आडगाव येथील इ-डेपोच्या बांधकामाला लवकर सुरुवात होत असताना आता २५ चार्जिंग स्टेशनसाठी ४१ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र महावितरणने सादर केले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून हमीपत्र मागवले होते. महावितरणने वीज पुरवठा करण्याचे हमीपत्र पालिकेला दिले आहे. हे हमीपत्र केंद्राला पाठवले जाणार आहे.
दरम्यान, ४१ केव्ही क्षमतेचे स्टेशन उभारण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्यासह चार्जिंग स्टेशनपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी एक कोटी २५ लाखांचा खर्च येणार आहे. हा खर्च पालिकेने द्यावा असे पत्रही महावितरण कंपनीने पालिकेला पाठवले आहे. त्यामुळे या खर्चाची तजवीज महापालिका सध्या करत आहे.
असे आहे चार्जिंग स्टेशन:
- ‘सिटी लिंक-कनेक्टिंग नाशिक’ च्या माध्यमातून सध्या शहरात २०० सीएनजी, तर ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस चालविल्या जातात.
- केंद्राच्या ‘एन कॅप’ योजनेंतर्गत आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या असून पहिल्या टप्प्यात ५० बसेस मिळणार आहेत.
- आडगाव ट्रक टर्मिनललगतच्या २ एकर जागेत इ-बसेसकरिता स्वतंत्र डेपो व चार्जिंग स्टेशन
- येथे चार्जिंगसाठी २५ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे.