नाशिक: अपघाताचे कारण सांगून वाहन थांबवत एकास बेदम मारहाण व लूट

नाशिक (प्रतिनिधी): वाहनाचा अपघात झाल्याचे कारण दाखवत एकाला बेदम मारहाण आणि लूटमार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चौघांना ताब्यात घेतली.

रात्री उशिरापर्यंत खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल वसंतराव कोटगिरे (४४, रा. हार्दिक अपार्टमेंट लोखंडे मळा, जेल रोड) हे बुधवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास त्यांच्या कारमधून (एमएच- १५- डीसी- ९४८२) पाथर्डी फाट्यापासून पाथर्डी गावाकडे जात होते.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

या वेळी वाहनासोबत अपघात झाल्याच्या कारणावरून शेल पेट्रोलपंपाजवळ चार संशयितांनी त्यांची कार अडवली. आतमध्ये बळजबरीने बसत गौळाणे रोडवरील हॉटेल एसएसके क्लब पुढे नेले. चौघांनीही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

तसेच खिशातील पाकीट आणि कागदपत्रे काढून घेतले. ५० हजार रुपये दे नाहीतर अजून मारहाण करू, अशी धमकी दिली. त्यानंतर फोन पेद्वारे संशयितांनी २१ हजार रुपये काढून घेतले. सदर प्रकार घडल्यानंतर कोटगिरे यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

इंदिरानगरच्या गुन्हे शोध पथकाने चार तासातच तपास चक्रे फिरवत चारही संशयिताना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणी तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाटील, जावेद खान, सागर परदेशी, विशाल पाठक, मुश्रीफ शेख, श्यामल जोशी, योगेश जाधव यांनी केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here