नाशिक: कसारा घाटात 300 फुट खोल दरीत आयशर वाहन कोसळुन 2 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात गुरुवार (ता.१९ रोजी) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या आयशर वाहन (क्र . एम .एच.१५ एच. एच. ९९७१ च्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने थेट तीनशे फुट खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून वाहन चालक राहुल जाधव (वय ३५ वर्ष) रा. खडकजांब, चांदवड जि. नाशिक व वाहक गणेश दुसिंग (वय ३४ वर्ष) रा. खडकजांब, चांदवड जि. नाशिक असे मृत्यु झालेल्यांची नावे असुन रात्री मुंबईहुन येतांना झोपेची डुलकी लगाताच वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.

आयशर वाहन थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला असुन घटनेत दोन जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांना सहा तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

अपघातातील दोनही मृतदेह जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या घटनेत महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी हरी राऊत, रावसाहेब पवार, पोलीस कर्मचारी मधुकर पवार, दिपक दिंडे, सागर जाधव, रूग्णवाहीका चालक कैलास गतीर सह कसारा पोलीस पथक व आपत्ती टिम यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.या घटनेचा तपास पोलीस पथक करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790