नाशिक: दोघा सराईत गुंडाची तडीपारी; महिन्याभरात 14 गुंडांवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याने या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुंडाविरोधात स्थानबद्धतेसह तडीपारीच्या कारवाया पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

यामुळे गुंडांचे धाबे दणाणले असून, आज आणखी दोघा सराईतांची शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

समाधान उर्फ सॅम अशोक बोकड (२३, रा. तिरडशेत माऊली मंदिराजवळ, सातपूर), पंकज अशोक मोरे (२९, रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, आगरटाकळी, नाशिकरोड) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे.

या दोघांविरोधात अंबड व उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, लुटमार, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, जाळपोळ आदीप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रस्ताव दिला असता, त्यानुसार आयुकत अंकुश शिंदे यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत.

परिमंडळ दोनमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुकत आनंदा वाघ, शेखर देशमुख यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी सराईत गुंडाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

महिन्याभरात १४ तडीपारी:
शहर पोलीस आयुकतालयाने गेल्या महिन्याभरात परिमंडळ दोनमधील १४ सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तर, गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत ४९ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९ गुंडांच्या मुसक्याही आवळल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790