नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध पथकाने मे. तिस्ता क्रोप केअर प्रा. लि. या पनीर उत्पादीत करणाऱ्या कारखान्यांवर सायंकाळी साडेसहा वाजता छापा टाकत १९४ किलो पनीर १९४ किलो पनीर, ८८ किलो रिफाइंड पोमोलिन ऑइल व १४९८ लिटर मिक्स मिल्क असा सव्वा लाख रुपयांचा साठा नष्ट केला. रात्री दोन वाजेपर्यंत पथकाकडून ही कारवाई सुरू होती.
अंबड लिंकरोडवरील मोरे मळा, लक्ष्मण टाऊनशिप, सिडको येथील अशोक जितलाल यादव यांच्या मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि. या पनीर उत्पादक कारखान्यातून पथकाने ४६५६० रुपये किमतीचे १९४ किलो पनीर, १४९४० रुपये किमतीचे ८८ किलो रिफाइंड पोमोलिन ऑइल व ४४९४० रुपये किमतीचे मिक्स मिल्कचा १४९८ लिटरचा साठा असा १०६४६० किमतीचा साठा जप्त करत नमुने घेऊन साठा जागेवरच नष्ट केला.
ताब्यात घेतलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून अहवाल आल्यानंतर अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार सबंधितावर कारवाई घेण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.
या पथकात सहायक आयुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त मनिष सानप, अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार, नमुना सहायक विजय पगारे यांचा समावेश होता.