नाशिक: दहावी-बारावी पुरवणी‎ परीक्षा 18 जुलैपासून‎

नाशिक (प्रतिनिधी): फेब्रुवारी व मार्चमधील परीक्षांमध्ये‎ अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे‎ शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये तसेच‎ त्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळावी या‎ उद्देशाने राज्य माध्यमिक आणि उच्च‎ माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व‎ बारावी पुरवणी परीक्षा घेतली जाणार‎ आहे.‎

मंगळवार (दि. १८) पासून सुरू‎ होणाऱ्या परीक्षेसाठी नाशिक विभागात‎ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात‎ आली आहे.

नाशिक विभागात‎ दहावीच्या परीक्षेसाठी ३६ केंद्रांवर ७‎ हजार ६२० परीक्षार्थी तर बारावीच्या‎ परीक्षेसाठी २९ केंद्रांवर ५ हजार २१९‎ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहे.‎

दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांसाठी‎ एकूण १२ हजार ८३९ विद्यार्थी प्रविष्ट‎ होणार आहेत.‎ विभागीय शिक्षण मंडळाद्वारे‎ जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी‎ परीक्षेची तयारी अंतिम झाली आहे.‎

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790