नाशिक (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत २५ जानेवारीपासून नाशिक – बेळगाव विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमान सेवेमुळे कोल्हापूर व गोव्याला फक्त दीड ते दोन तासात पोहोचणे शक्य होणार आहे.
नाशिक हे शहर उडान योजनेअंतर्गत देशभरातील मोठ्या शहरांना जोडले जावे यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ओझर विमानतळावरून हैद्राबाद, दिल्ली,पुणे,अहमदाबाद या ठिकाणची विमानसेवा कार्यरत आहे. नाशिक मधून पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने विमानसेवा सुरू होण्याची मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. २५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या विमानाची क्षमता ही ५० सिटची असून त्यामधे २५ सिटांच्या तिकिटावर ५० टक्के अनुदान असणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवार,शुक्रवार आणि रविवारी उपलब्ध राहणार असून तिकीटाची किंमत २२०० ते २५०० रुपये असेल. नाशिक – बेळगाव हा प्रवास साधरण एक तासाचाच असणार आहे.