नाशिक (प्रतिनिधी): १५ वर्षाच्या बालकाने मोठ्या भावाने गाणे ऐकण्यासाठी हेडफोन दिला नाही, याचा राग मानून विष प्राशन केले हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्यात घडली. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील गोळाखाल परिसरात रंगनाथ महाले कुटुंबीय वास्तव्यास आहेत.
रविवारी (दि.४ ऑक्टोबर) रोजी महाले यांच्या दोन्ही मुलांमध्ये भ्रमणध्वनीमधील गाणे ऐकण्यासाठी हेडफोनवरून वाद झाला. लहान मुलगा अतुल (वय १५) याने मोठ्या भावाकडून गाणे ऐकण्यासाठी दोन-तीन वेळा हेडफोन मागितला. मात्र, मोठ्या भावाने हेडफोन दिला नाही. या गोष्टीचा राग येऊन, धमकवण्याच्या नादात घरात असलेल्या विषारी द्रव्याची बाटलीच त्याने तोंडाला लावली. कुटुंबीयांनी त्याच्या हातातून बाटली काढून घेतली. मात्र, विष अंगात भिनण्यास सुरवात झाली होती. त्याला तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.