सटाण्यातील कुटुंबाच्या कारचा अपघात, आईवडिलांच्या डोळ्यांदेखत तीन वर्षीय श्रीयांशचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सटाणा शहरातून अक्षय्यतृतीयेचा सण साजरा करुन पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या डोंगरे परिवाराच्या कारचा सिन्नर-संगमनेर दरम्यान भीषण अपघात होऊन तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या परिवारासह सण साजरा केला. त्यानंतर बहिणीला भेटण्यासाठी परिवारासह एका चारचाकी वाहनातून निघाले, मात्र वाटेत नियतीने घात केला आणि आईवडिलांच्या डोळ्यांदेखत कोवळ्या श्रीयांशचा मृत्यू झाला. तर डोंगरे यांची पत्नी, आई, मुलगा जखमी असून, चालकासही दुखापत झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिथून उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपल्या परिवारासह अक्षय्य तृतीया सण साजरा केला. त्यानंतर ते शनिवारी आई, पत्नी, दोन्ही मुलांसह बहिणीकडे पुण्याला निघाले. यासाठी चारचाकीतून वाहनातून सगळा परिवार पुण्याला निघाला. त्यासाठी ते सिन्नर संगमनेर मार्गे जाण्याचे ठरले. त्यानुसार ते सटाणा शहरातून बाहेर पडले. दरम्यान सिन्नर-संगमनेरजवळ आले असता दुभाजकाला गाडी धडकली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

यात चारचाकी वाहन अनेकदा उलटले. यात डोंगरे कुटुंबातील तीन वर्षीय बालक श्रीयांश याचा मृत्यू झाला. तर आईच्या कमरेला जबर मार बसला असून पत्नीच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच पप्पू डोंगरे आणि त्यांचा मोठा मुलगा किरकोळ जखमी आहेत. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी डोंगरे कुटुंबियांना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले. तिथून अपघातात जखमी झालेल्या डोंगरे परिवाराला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर श्रीयांशवर मोठ्या शोकाकुल वातावरणात सटाणा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790